Vadgaon News : संकटात रुग्णसेवा पुरविणाऱ्या कोरोना योद्धयांचा भाजप सदैव ऋणी – भास्करराव म्हाळसकर

वडगांव भाजपच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्धांचा सन्मान

एमपीसी न्यूज -एमपीसीन्यूज : कोविड 19 संकटात सर्व डॉक्टर आणि मेडिकल व्यावसायिक यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता वडगावच्या जनतेसाठी अहोरात्र सेवा केली आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेप्रती त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या सेवाकार्याबद्दल भारतीय जनता पक्ष त्यांचा सदैव ऋणी राहील, अशा शब्दांत मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी रुग्णसेवा पुरविणाऱ्या कोरोना योद्धयांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त वडगाव शहर भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा, व्यापारी मोर्चा आणि विद्यार्थी मोर्चा यांच्या वतीने वडगाव शहरातील सर्व डॉक्टर आणि मेडीकल दुकानदार यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हाळस्कर बोलत होते.

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा, पंडीत दीनदयाळजी उपाध्याय आणि एकात्म मानव दर्शन हे विनय पत्राळे लिखीत पुस्तक, श्रीफळ आणि पुष्प असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे, श्री. पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे, अरविंद पिंगळे, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष नारायणराव ढोरे, माजी विश्वस्त पंढरीनाथ भिलारे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, नगरसेवक प्रविण चव्हाण, अ‍ॅड. विजयराव जाधव, किरण म्हाळसकर, सुनीता भिलारे , माजी सरपंच नितीन कुडे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, मावळ भाजपा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे, व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा, युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष विकी म्हाळसकर, मावळ भाजपा सरचिटणीस सुनिल चव्हाण, जेष्ठ नेते विठ्ठलराव घारे, युवा मोर्चा कार्याध्यक्ष शेखर वहिले, राष्ट्रीय खेळाडू गोकुळ काकडे, खंडूशेठ भिलारे, दीपक भालेराव, योगेश म्हाळसकर, वैशाली ढोरे , वैशाली म्हाळसकर, सुजाता बवरे, अश्विनी बवरे, श्री.पोटोबा मंदिर पुजारी सुरेश गुरव, प्रभाकर जोशी, दत्तात्रय निकम आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे, डॉक्टर आणि मेडिकल व्यावसायिक यांच्या वतीने डॉ. कुंदन बाफना यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सर्वश्री डॉ. नेमीचंद बाफना, पार्थ शिंदे, कुंदन बाफना, विकास कुडे, गौरव धंदुके, दिनेश दाते, अक्षय काटे, स्वप्नाली बवरे, मनोज पाटील, निलेश मसलेकर, राजकुमार बाणे तसेच मेडिकल व्यावसायिक नूतन ढोरे, अमोल पवार, सुरेश बाफना, कांतीलाल बाफना, दुर्गा तुरकणे, संदीप बाफना आदींनी हा सन्मान स्वीकारुन या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

स्वागत शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी केले.  प्रास्ताविक व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा यांनी केले,. सूत्रसंचालन मावळ भाजपा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे यांनी केले.  आभार कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.