Pimpri : आणि ती नवऱ्याकडे परतलीच नाही….

एमपीसी न्यूज – वल्लभनगर आगारातील पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने झालेल्या अपघातामुळे शिल्पाचा पाच वर्षाचा संसार कोसळला. शिल्पा पुण्यात नोकरी करीत होती तर तिचा पती नागपूरमध्ये,  दोघेही एकामेकांपासुन नोकरीनिमित्ताने लांब राहत असल्यामुळे शिल्पाने नोकरीसोडून नागपूरला जाणाऱ्याचा निर्णय घेतला.(Pimpri) त्यासाठी शिल्पाने कामाच्या बदलीसाठी सतत वरिष्ठांकडे अर्ज केली होते. शिल्पाने आपल्या  पतीला  वचन दिली होते. लवकरच आपण एकत्र राहू पण म्हणतात नं वेळ ही सांगून येत नसते. अशा नव्याने एकत्र येऊन संसार थाटण्याची स्वप्न पाहणार्या शिल्पासाठी तो दिवस अखेरचा ठरला.

MPC News Special : शहरातून दररोज सातजण होताहेत बेपत्ता; अल्पवयीन मुलींचे प्रमाण धक्कादायक

वल्लभनगर आगारात शिल्पा प्रवास करत असलेल्या बसचा ब्रेक फेल झाला व त्यात तिला आपला जीव गमवाव लागला. शिल्पा हि मूळची नागपुर येथील इदोरा येथील होती. तर तिचे सासर  हे नागपुरमधील  कन्हान येथील होते. पाच वर्षापूर्वी शिल्पाचा विवाह कैलास गेडाम यांच्यासह  झाला. (Pimpri)  नोकरीनिमित्ताने शिल्पा पिंपरी येथील वल्लभनगर आगारातील मॅकनिक विभागात साहाय्यक म्हणुन कामाला होती व तिचा पती कैलास हा नागपूरमध्ये कामाला होता . मात्र वल्लभनगर आगारातील भीषण अपघातात  शिल्पाला सोमवारी दि. 8  सकाळी साडेआठच्या सुमारास आपला जीव गमवाव लागला. त्यामुळे शिल्पाचे सुखी संसाराचे स्वप्न अपुरेच राहिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.