Valhekarwadi News : अनधिकृत बांधकामावर प्राधिकरणाचा हातोडा ; वाल्हेकरवाडीतील इमारत जमीनदोस्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. याअंतर्गत प्राधिकरणाच्या जागेत अनधिकृत बांधकाम करणा-यांना नोटीस बजावण्यात येत आहेत. वाल्हेकरवाडीत उभारलेल्या अनधिकृत इमारती प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागामार्फत जमीनदोस्त करण्यात आल्या.

वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील सर्व्हे नंबर 124, 125 व 126 अथर्व पार्कमध्ये पाच गुंठे जागेतील सुमारे 8 हजार 800 चौ.फुट तळमजला व पहिल्या मजल्याची आरसीसी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्याचसमोर तीन गुंठे जागेमधील चार मजली इमारतीचे सुमारे 9 हजार 500 चौ.फुट बांधकाम आर्धे पाडण्यात आले आहे.

या कारवाईसाठी तीन पोकलेन, दोन जेसीबी, दोन ट्रॅक्‍टर ब्रेकर यांचा वापर करण्यात आला. यापुढे अशाप्रकारच्या कारवाया सुरुच राहणार असल्याचे प्राधिकरण विभागाने स्पष्ट केलं आहे.

वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामामध्ये सर्वसामान्य लोकांनी घरे अथवा गाळे खरेदी विक्री करु नये. खरेदी करण्यापूर्वी बांधकामांची बांधकाम परवानगीच्या कागदपत्रांची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.