Pimpri : किरकोळ कारणावरून वडापाव विक्रेत्याची कंपनीत घुसून मारहाण 

एमपीसी न्यूज – फ्रेश होण्यासाठी कंपनीत जाऊ दिले नाही, म्हणून एका वडापाव विक्रेत्याने आपल्या साथीदारांसोबत कंपनीत घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना मोरवाडी येथे गुरुवारी (दि.18) पहाटे घडली.

मनराखनलाल राजाराम मिश्रा (वय 60, रा. लिटीका फार्मा कंपनी, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. गोपाल नंदकिशोर सोनी (वय 23, रा. लालटोपीनगर, पिंपरी) आणि त्याचे तीन साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाल याची मोरवाडी न्यायालयासमोर वडापावची गाडी आहे. तर मिश्रा हे लिटीका कंपनीत कामाला आहेत. गोपाल याला फ्रेश होण्यासाठी लिटिका कंपनीत जायचे होते. त्यासाठी मिश्रा यांनी त्याला जाऊ दिले नाही. या कारणावरून गोपाल याने त्याच्या साथीदारांसोबत संगनमत करून कंपनीत घुसून मिश्रा आणि त्यांचा पुतण्या आदेश या दोघांना लाथा-बुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. तसेच मिश्रा यांच्या पायावर दगड मारून त्यांना जखमी केले. पोलिस उपनिरीक्षक विलास पालांडे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.