Morwadi : मोरवाडीतील आग प्रकरणी अमृतेश्वर ट्रस्टला नोटीस

एमपीसी न्यूज – मोरवाडी येथील अमृतेश्वर कॉलनीमागील रिकाम्या ( Morwadi) जागेतील रबर, प्लास्टिक, टायर अशा भंगार साहित्याला मोठी आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी  अमृतेश्वर ट्रस्टला महापालिकेने 10 लाखांची नोटीस दिली आहे.

Chinchwad : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी साहित्यिकांचा गौरव

मोरवाडी, अमृतेश्वर कॉलनी येथील मोकळी जागा ही अमृतेश्वर ट्रस्टची आहे. त्या मोकळ्या जागेत औद्योगिक क्षेत्रातील रबर, प्लास्टिक, टायर व इतर भंगार साहित्य आणून टाकले जात होते. या भंगार मालाला 21 फेब्रुवारीला दुपारी आग लागली.   ती इतकी मोठी होती की आग आटोक्यात आणण्यासाठी 13 अग्निशमन बंब अपुरे पडले होते. आग धुमसत असल्याने रात्रभर धूर कायम होता. दुस-या दिवशी सकाळी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला.

मोरवाडीत मोकळ्या जागेत भंगार साहित्य जमा केले होते. याठिकाणी लागलेल्या आगीस कारणीभूत ठरल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने गुरूवारी (दि.29) अमृतेश्वर ट्रस्टला नोटीस दिली आहे. तसेच 10 लाखांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पर्यावरण विभागाचे  सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी ( Morwadi) सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.