Wakad : सराईत वाहन चोरट्यास अटक; 11 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखा युनिट चारने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून चोरलेल्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

राहुल दगडू शिंदे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस रेकॉर्डवरील आरोपींची माहिती तपासत असताना आरोपी राहुल शिंदे हा त्याच्या मूळ पत्त्यावर राहत नसल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट चारने राहुल शिंदे याच्याबाबत माहिती काढून त्याला ताब्यात घेतले.

NCP : ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा निर्णय – जयंत पाटील

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मागील एक वर्षात पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून 11 दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेली वाहने तो इतर नागरिकांना कमी पैशांमध्ये विकत असे. पोलिसांनी राहुल शिंदे याच्याकडून पाच लाख 10 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपी राहुल शिंदे याला सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Pune : पीएमआरडीएच्या 1 हजार 926 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.