Velhe : लायसन्स देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात अटक

एमपीसी न्यूज : लायसन्स मिळवण्यासाठी तीस हजार रुपयांची (Velhe) लाच घेताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील लिपिकाला रंगेहात पडकण्यात आले. वेल्हे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या प्रकरणी 55 वर्षीय पुरुषाने तक्रार दाखल केली होती. तर लिपिक पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती अशी, की तक्रारदार यांनी सावकारी लायसन्स मिळवण्यासाठी वेल्हे येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे प्रस्ताव मांडला होता. परंतु, जिल्हा निबंध कार्यालयात पाठपुरावा करून लायसन्स मिळवण्यासाठी आरोपी पंढरीनाथने पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.

यामध्ये तीस हजार रुपये लायसन्स तसेच वीस हजार रुपये स्वतःसाठी असे नियोजन करून 30 हजार कॅश देऊन उर्वरित रक्कम बँकेत जमा करण्यास सांगितले. सदर रकमेतील तीस हजार रुपये (Velhe) स्वीकारताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पुढील तपास ला. प्र.  वि. पुणे येथील पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करत आहेत.

Nigdi : महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.