Today’s Horoscope 17 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

17.06.2023.

शुभाशुभ विचार- चतुर्दशी वर्ज्य. 

आज विशेष- दर्श अमावास्या.

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – रोहिणी 16.25 पर्यंत नंतर मृग.

चंद्र राशी – वृषभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमची आर्थिक बाजू भक्कम ठेवणार आहे. तुम्हाला आज प्रत्येक कामात दांडगा उत्साह राहील. कार्यक्षेत्रात यशाची कमान चढती राहील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )

आज हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल राहील. वेळेचे योग्य नियोजन करून कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करू शकाल. विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल

मिथुन ( शुभ रंग- केशरी )

तरुणांच्यात विलास वृत्ती बळावेल. जमाखर्चाचे गणित बिघडेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण गरजेचे राहील. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

कर्क (शुभ रंग- तांबडा)

काही पैशाअभावी रखडलेले उपक्रम असतील तर ते सुरू करता येतील. नवीन लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. काही दुरावलेले आप्तस्वकीय मित्र जवळ येतील. दिवस लाभाचा.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढला असला तरीही तुमची वाटचाल ध्येयाच्या दिशेने सुरू आहे. पूर्वीचे कष्ट करणी लागतील. कार्यक्षेत्रात यश दृष्टीक्षेपात येईल.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यायला हवेत. व्यवसायात मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नका. हट्टीपणास आवर  घालून अनुभवींचे सल्ले विचारात घ्या.

तूळ ( शुभ रंग- मोरपंखी)

आज आपल्या मर्यादा ओळखून वागा. कोणतेही धाडस आज तरी नको. वैवाहिक जीवनातही जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक करू नका. कायद्यात राहा, आपल्या प्रतिष्ठेस जपा.

वृश्चिक (शुभ रंग- डाळिंबी)

व्यस्त दिनचर्येतूनही आज आपण आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ देण्याचा प्रयत्न कराल. जोडीदारास आज एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल. आज मुलांचे हट्ट तुम्ही हौशीने पुरवाल.

धनु- (शुभ रंग- तांबडा)

काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. महत्वकांक्षे मागे धावताना तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात असू द्या.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील. नवोदित कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील. आज रुग्ण ठणठणीत बरे होतील.

कुंभ (शुभ रंग – मरून)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. वास्तु व वाहन खरेदीची रखडलेली कामे मार्गी लागतील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

मीन -(शुभ रंग – आकाशी )

आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाईल. मातोश्रीशी आज काही सौम्य मतभेद होण्याची शक्यता आहे. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.