Pune News : वेल्हे तालुक्यातील खून प्रकरणात आठ आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : ऐन होळीच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात युवकाचा गोळ्या झाडून व धारदार चाकूने व सत्तुरने चेहऱ्यावर सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती.(Pune News) या गुन्ह्यात तब्बल आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हा खून जमिनीच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ उर्फ पप्पू नामदेव रेणुसे (वय-38) याच्यावर गोळ्या झाडून व धारदार हत्यारांनी वार करुन खून करण्यात आला. हा प्रकार वेल्हे येथील हॉटेल विशाल येथे घडला. ज्ञानेश्वर उर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे याने सात ते आठ वर्षापूर्वी मरळ आवाडातील जमीन खरेदी केली होती व तीच जमीन पुन्हा खरेदी केली. त्या जमिनीबाबत पहिल्या पार्टीची कोर्टात केस सुरु होती.

Shivaji Maharaj : विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार; आमदारांची समिती स्थापन

या जमिनीबाबत मृत पप्पू रेणुसे हा लोकांना एकाचे दोन सांगत असल्याचा संशय माऊली रेणुसे याला होता. त्याचा राग मनात धरुन आरोपीने त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने पप्पू रेणुसे याच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने चेहऱ्यावर सपासप वार करुन निघृण खून केला.(Pune News) या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.