Shivaji Maharaj : विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार; आमदारांची समिती स्थापन

एमपीसी न्यूज : विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासंदर्भात मोठी बातमी हाती आली आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj) बदलण्यात येणार आहे. यासाठी विधीमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा दिसणार आहे.

विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यात येणार आहे. यासाठी विधीमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना केली असून सोमवारी समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.

NCP : नागालँडमध्ये भाजपला राष्ट्रवादीने दिलेल्या समर्थनावर शरद पवार म्हणाले..

विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता नव्या रुपात दिसणार आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यासाठी पुतळा समितीची (Shivaji Maharaj) स्थापना करण्यात आली आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम हे सर जे जे कला महाविद्यालयास देण्यात येणार आहे.

विद्यमान पुतळ्यावर आक्षेप काय?

सध्या विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. मात्र, महाराज बसलेले सिंहासन महाराजांच्या पुतळ्यापेक्षा मोठे आहे.(Shivaji Maharaj) त्याशिवाय, महाराजांच्या पुतळ्यावरचे भाव, तेज कमी दिसत असल्याने प्रभावी वाटत नसल्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.