Nagnath Kottapalle: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

एमपीसी न्यूज: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज यांचे आज दुपारी पावणेदोन वाजता कर्करोगाने निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. चिपळूण येथे झालेल्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Bhosari News : आरसीसी बांधकामाचे खरेदीखत करून देत महिलेची 32 लाखांची फसवणूक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर येथे ते वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेशुध्द अवस्थेत होते. कोतापल्ले हे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षही आहेत. सामाजिक भान असलेले लेखक म्हणून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची ओळख होती.

मराठीच्या पदव्युत्तर परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते औरंगाबादला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. 1993 च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक रुजू झाले. तेथे ते विभागप्रमुख असताना त्यांची औरगांबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली.

डॉ. कोत्तापल्ले यांचे पार्थिव संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांच्या पिंपळे सौदागर येथील घरी आणण्यात येणार आहे. त्या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी अर्धा तास ठेवून नंतर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी येथे साडेआठ वाजता अंत्यविधी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.