Bhosari News : आरसीसी बांधकामाचे खरेदीखत करून देत महिलेची 32 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज महिलेला एक गुंठ्याचे आरसीसी बांधकामाच्या व्यवहारात वेळेावेळी 32 लाख रुपये घेऊनही खरेदी खत करून देत दोघांनी फसवणूक केली आहे. (Bhosari News) हा प्रकार भोसरी येथील सर्वे नंबर 137 येथे 16 मे 2019 ते आज अखेर या कालावधीत घडला

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी महिला आरोपी व नितीन छगन भांडवलकर (रा. परांडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : मिळकतीला मोबाईल नंबर लिंक करा अन् सामान्यकरात तीन टक्के सवलत मिळवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 16 मे 2019 रोजी आरोपीने भोसरी येथील सर्वे नं137 हिस्सा नं.1/1 मधील एक गुंठा क्षेत्रावर असलेले आर.सी.सी. बांधकामातील  घराचे खरेदी खत करुन देतो म्हणून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन किंवा रोख (Bhosari News) असे एकूण 32 लाख 50 हजार रुपये घेतले मात्र अखेर खरेदी खत करून दिले नाही. मागणी केल्यानंतर ताबा कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्र व त्या आधारे साठेखत व नोटरी स्वरूपात दित फिर्यादी यांची दिशाभूल केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.