Dighi crime : सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 4 महिलांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात चार महिलां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Dighi crime) हा प्रकार मंगळवारी (दि.29) दिघीतील मॅग्झीन चौकाजवळ फुटपाथवर घडला.

Bhosari News : आरसीसी बांधकामाचे खरेदीखत करून देत महिलेची 32 लाखांची फसवणूक

अकुंर निवास पाटील (वय 19 रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 4 महिलां विरोधात सीआरपीसी कलम 41 (1) (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.(Dighi Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला फिर्यादी व इतरांना अश्लील हातवारे व हावभाव करून येणाऱ्य़ा-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करत होत्या.यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत होता. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल झाल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.