Virat Kohli : टीम इंडियाची रन मशीन विराट कोहलीला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बारा वर्ष पूर्ण

भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) ने विराट कोहलीला आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 12 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेछया दिल्या आहेत. : Team India's run machine Virat Kohli completes 12 years in international cricket

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा कर्णधार व रन मशीन अशी ओळख असलेल्या विराट कोहली याला आज आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. विराटने याच दिवशी 2008 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी श्रीलंके विरूद्ध डम्बुला येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली होती.

भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) ने विराट कोहलीला आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 12 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेछया दिल्या आहेत.

‘याच दिवशी तरुण विराट कोहलीने भारतीय संघाची जर्सी घातली होती, बाकी सर्व तर इतिहास आहे’, असं बीसीसीआयने ट्विट केले आहे. आयपीएल संघ आरसीबीने देखील विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

31 वर्षीय विराट 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता, तसेच 2013 च्या चॅम्पियन ट्रॅाफी विजेत्या संघात देखील तो सामिल होता. विराटने कमी वयात विविध रेकॅार्डला गवसणी घातली आहे.

विराटने 20 जून 2011 साली वेस्ट इंडिज विरूद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली. त्याने आत्तापर्यंत 86 कसोटी सामने खेळले असून 53.63 च्या सरासरीने 7,240 धावा केल्या आहेत.

विराटने कसोटी कारकिर्दीत तब्बल सात वेळा द्वीशतक ठोकले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. कसोटीत विराटच्या नावे 27 शतकांची नोंद आहे.

एकदिवसीय कारकिर्दीत विराटने 248 सामने खेळले असून 59.34 च्या सरासरीने 11,867 धावा केल्या आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत त्याने 43 शतके ठोकली आहेत. टि20 फॅारमॅट मध्ये विराटने 81 सामने खेळत 2,794 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये विराट बंगळूर संघाकडून खेळतो. त्याने आयपीएलमध्ये 177 सामने खेळले असून 5,412 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने पाचवेळा शतकी खेळी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.