Ind Vs NZ Test : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व

एमपीसी न्यूज – न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या सामन्यासाठी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हिटमॅन रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून, चेतेश्वर पुजाराकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल.

असा असेल संघ –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), के एल राहुल, मयंक अगरवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धीमान सहा, के एस भरत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

(दुसऱ्या सामन्यात विराट कोहली संघाची धुरा सांभाळेल)

सामान्यांचे वेळापत्रक –

  • गुरुवार (25 नोव्हेंबर) – कानपूर
  • शुक्रवार (3 डिसेंबर) – मुंबई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.