Vadgaon Maval : महागाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य सरकारने केलेल्या महागाईच्या निषेधार्थ मावळ तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि. 11) सकाळी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष कमलेश उकरंडे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, माजी जिल्हाध्यक्ष उत्तम वनशिवे, तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, जिल्हा संघटक राजू गायकवाड, तालुका प्रवक्ते कैलास साबळे, रमेश ओव्हाळ, बाळकृष्ण टपाले, लहू लोखंडे, जयश्री सदावर्ते, अमिना शेख, महेश परमार, कमरुद्दीन शेख, राजू कांबळे, जयराम साळवे, प्रकाश गायकवाड, बबन पिचड, कोंडीबा खरात बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

देशातील पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी व खाद्यतेल यांची दरवाढ कमी करा, केंद्राने पेट्रोल व डिझेल जीएसटी अंतर्गत लागु करावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, मावळ तालुक्यात पुणे-लोणावळा रेल्वे लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करावी, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, एस.सी.,एस.टी. अल्पसंख्याकाचे बजेट त्यांच्याचसाठी वापरावे आदी मागण्याचे निवेदन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.