IPL 2023 : आयपीएल फ्रँचायझर्सने इंग्लंडच्या सहा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संघातून माघार घेण्यास सांगितले

' टाइम्स लंडन ' चा रिपोर्ट

एमपीसी न्यूज – टाइम्स लंडन यांच्या रिपोर्ट प्रमाणे आयपीएलच्या फ्रँचायझींनी इंग्लंडच्या काही नामवंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातून माघार घेण्यास सांगितले आहे. (IPL 2023) आईपीएलचे संघ या खेळाडूंना साधारण 5 कोटी चा करार देत आहेत ज्या करारामध्ये  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेऊन वर्षभर क्लब क्रिकेट खेळावे असे या संघांच्या मालकांचे म्हणणे आहे. आयपीएल मधले बरेच संघ आता आंतरराष्ट्रीय लीग मध्ये स्वारस्य दाखवत आहेत . कॅरीबीयन प्रीमियर लीग, एस. ए. प्रीमियर लीग, यूएईचा आयएलटी 20 लीग, आणि पुढे येणाऱ्या बऱ्याच लिग्स मध्ये भारतीय संघ गुंतवणूक करत आहेत.

रिपोर्ट प्रमाणे कुठले संघ हे कारस्थान करत आहेत अथवा कुठल्या खेळाडूंना हा करार देण्यात येत आहे हे अद्याप कळलेले नाही. परंतु आपण याबाबत अंदाज बांधू शकतो. अंदाजानुसार म्हणण्यात येत आहे की ज्या इंग्लंडच्या खेळाडूंनी 2019 चा विश्वचषक जिंकला होता तेच सहा खेळाडू असतील. त्यामध्ये आयपीएल आणि विश्वचशक जिंकलेले खेळाडू म्हणजे सीएसकेचे बेन स्टोक्स व मोईन अली, राजस्थान रॉयल्सचा जोस बुट्ट्लर, मुंबई इंडिअन्सचा जाफ्रा आर्चर, कोलकाता नाईट रायडर्सचा जेसन रॉय आदी खेळाडू आहेत.

Pimpri : पिंपरी-चिंचवड येथील शिक्षिकेचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

सध्या सौदी अरेबिया येथे एक नवीन 20 षटकांचा लीग सुरु होणार आहे जो सौदी अरेबियाच्या प्रतिष्टेप्रमाणे जगातला सर्वात श्रीमंत लीग ठरू शकतो. टीव्ही राईट्सनी अधिक पैसा मिळण्याची शक्यता आहे म्हणून आयपीएलच्या बऱ्याच संघांचे मालक त्या नव्या लीग मध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असतील.(IPL 2023) सुरुवात फक्त इंग्लंडच्या खेळाडूंपासून झाली आहे. परंतु पुढे अजून देशातल्या खेळाडूंशी सुद्धा संपर्क साधला जाऊ शकतो. या प्रमाणे बघायला गेले तर क्रिकेटची दुनिया हि सुद्धां युरोपच्या फुटबॉल सारखी होईल जिथे वर्षभर क्लब सामने चालतात आणि वर्षांतून फार कमीवेळा फक्त आंतरराष्ट्रीय सामने होतात.

सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यांना प्रेक्षक कमी उत्सुक दिसतात. फक्त विश्वचषक, आशिया करंडक आदी या वेळी प्रेक्षक  जास्त उत्सुक असतात. 2000 मध्ये आलेल्या t20 नंतर क्रिकेटमध्ये जास्त उत्क्रांती हि झालेली नाही. मग खेळाचे हे नवीन स्वरूप हे प्रेक्षकांचे मन परत जिंकू शकेल का ते पहावे लागणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.