Pimpri : पिंपरी-चिंचवड येथील शिक्षिकेचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

एमपीसी न्यूज़ : लता अण्णा नवले (शितल भानुदास औटी) यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक सन्मान गौरव पुरस्कार रविवार दि.23  एप्रिल 2023 रोजी देण्यात आला. 

तानाजी पवार यांचे आनंदगंगा फाउंडेशन  कोल्हापूर यांच्या मार्फत क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 चे मोठ्या शानदार कार्यक्रमात वितरण करण्यात आले.

Pimpri : मधमाशीच्या सहजतेने कर संकलित व्हावा – ज्येष्ठ विधिज्ञ नितीन शहा

याप्रसंगी पुणे जिल्ह्यातून दोन गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील संस्थापक गोविंद दाभाडे सर यांच्या  नवनगर शिक्षण मंडळाचे (Pimpri) श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी या प्राथमिक शाळेतील शिक्षिका लता अण्णा नवले (शितल भानुदास औटी ) यांची निवड करण्यात आली होती.

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार  मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. याकरिता शाळेचे मुख्याध्यापक माळे सर यांचे फार मोठे सहकार्य लाभले.(Pimpri) याराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी स्थानिक गट शिक्षण अधिकारी व सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.