Mumbai Pune Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 13 गाड्या एकमेकांवर आदळल्या

एमपीसी न्यूज  : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Expressway Accident) अनेक वाहनांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. खोपोली (Khopoli) एक्झिट जवळ वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या भीषण अपघातात 7 ते 8 वाहने एकमेकांवर आदळली आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रक यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना खोपोली येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील खोपीलीजवळील एक्झिट जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबीची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली आहे.

अनेक वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. त्यादरम्यान, काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. (Mumbai Pune Expressway Accident) यामध्ये दोन ट्रक आणि 11 गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता गाड्या बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.