Lonavala : ग्रुप ग्रामपंचायत डोंगरगांव-केवरेवसाहत येथे आज सरपंच पदासाठी मतदान

एमपीसी न्यूज – ग्रुप ग्रामपंचायत डोंगरगांव-केवरेवसाहत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ननावरे तसेच पोलिसांच्या सहकार्याने शांततेत मतदान पार पडले. सर्व उमेदवारांनी ईव्हीएम मशीनची पूजा करून सकाळी साडेसात वाजता निवडणुकीला सुरुवात झाली. 

शासनाने १९ जुलै २०१७ ला सरपंच निवडही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे. नगरपालिकेप्रमाणे पहिल्यांदाच सरपंच पदासाठी गावात थेट निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे. या ग्रामपंचायतीला नऊ सदस्य संख्या आहे. सरपंच पदासाठी तिन्ही गावातून मिळून पाच उमेदवार निवडणुकीला उभे होते. त्यासाठी अशोक ठुले, भाऊ भिवडे, सुनील येवले, मदन नाणेकर, मारुती आडकर यांनी सरपंच पदाचे उमेदवार आहेत. त्यासाठी आज ८३%मतदान झाले.

शहरी भागात दिसत असलेला पक्ष यावेळी सरपंच पदासाठी ही पक्ष पाहायला मिळाला. त्यामुळे निवडून कोण येणार याकडे ग्रामस्थांचे वेध लागलेत. त्यासाठी उद्या मत मोजणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.