Wakad : ‘लहान मुलांना का त्रास देतो’ म्हटल्याने तरुणावर कोयत्याने वार; तीन आरोपी गजांआड

A young man is stabbed for saying 'why bother children'; Three accused arested

एमपीसी न्यूज – ‘तू लहान मुलांना कशाला त्रास देत असतो’ असे म्हटल्यावरून तिघांनी मिळून एका तरुणाला कोयता, चॉपर आणि दगडाने मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी आठ वाजता नढेनगर, काळेवाडी येथे घडली.

आकाश बाबुराव पवार (वय 21), कृष्णा उत्तम सोनवणे (वय 19), गणेश उर्फ अजय दत्तात्रय कांबळे (वय 19, तिघे रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अमोल श्याम क्षीरसागर (वय 29, रा. घरकुल चिखली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आठ वाजता फिर्यादी अमोल त्यांच्या मित्रासोबत नढेनगर, काळेवाडी येथील राधाकृष्ण मंदिराजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी आकाश पवार तिथून जात होता.

फिर्यादी अमोल आरोपीला म्हणाले, ‘तू लहान मुलांना कशाला त्रास देत असतो.’ याचा राग मनात धरून आरोपी आकाश याने त्याच्या अन्य साथीदारांसोबत मिळून फिर्यादी अमोल यांना कोयता, चॉपर आणि दगडाने मारले.

यात त्यांच्या पाठीत, हातावर, डोक्यात गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.