Wakad : महिलेच्या 50 लाखांच्या फसवणूक प्रकरणी जेसीबी कॅपिटल कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने (Wakad ) महिलेला दोन कोटी रुपये परताव्यात देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, या व्यवहारात महिलेची तब्बल पन्नास लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार तीन मार्च 2020 ते 15 मार्च 2021 या कालावधीत वाकड येथे घडला.

याप्रकरणी बुधवारी (दि.16) महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी जेसीबी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर राहुल गुलाबसिंग जाखड (रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला जेसीबी कॅपिटल व जेसीबी ॲग्रोटेक या दोन कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यामध्ये मोठा परतावा देण्याचे आमिष त्याने दाखवले.

Chakan : गाडीतून पेट्रोल चोरणाऱ्यांना नागरिकांनीच केले पोलिसांच्या हवाली

फिर्यादी महिलेने पन्नास लाख रुपये चेकद्वारे आरोपीला दिले. या बदल्यात 2 कोटी परत करण्याचा करारनामाही केला. मात्र, अद्याप कोणतीच रक्कम परत न करता आरोपीने फिर्यादीची फसवणूक (Wakad) केली. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.