Wakad : थेरगावमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – 16 नंबर कडून काळेवाडी फाट्याकडे (Wakad) जाणाऱ्या सेवा रस्त्याची रुंदी कमी असल्याने परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत.

16 नंबर कडून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याची रुंदी कमी आहे. त्याच ठिकाणाहून पवारनगर गल्ली व थेरगावकडे जाणारी लेन आहे. त्यामुळे परिसरात सतत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कावेरीनगर सबवे मधून मोटारसायकल, रिक्षा वगळता अन्य सर्व वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

Bhosari : युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगत तीन लाखांची फसवणूक

कावेरीनगर सबवे कडून काळेवाडी फाट्याकडे जाणारी वाहने गुजरनगर अंडरपास येथून येथून इच्छित स्थळी जातील. तसेच 16 नंबरकडून वेणुनगर, कावेरीनगरकडे जाणारी वाहने काळेवाडी फाटा येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जातील.

वरील बदल हे तात्पुरत्या स्वरुपात आहेत. याबाबत नागरिकांना हरकती आणि सूचना असतील तर त्यांनी 9 जुलै पर्यंत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेत लेखी स्वरुपात कराव्यात. त्यानंतर अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले (Wakad) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.