Bhosari : युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगत तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यावरील (Bhosari ) व्हिडिओला लाईक करण्यास सांगत एका महिलेची तीन लाख 14 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 9 ते 25 जून या कालावधीत भोसरी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (740)8422086 क्रमांक धारक महिला, @AReceptionistBrandee, @JalpanNita,@MentorNita हे टेलिग्राम आयडी धारक महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिघांना शस्त्रासह अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक करण्यास सांगितले. त्यानंतर मर्चंट व्यवहार पूर्ण केला तरच जास्त परतावा मिळेल असे सांगून फिर्यादीकडून दोन लाख 44 हजार आणि त्यांच्या मैत्रिणीच्या खात्यावरील 70 हजार असे एकूण तीन लाख 14 हजार रुपये घेतले.

त्यानंतर त्यांची मूळ रक्कम अथवा त्यावरील परतावा न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत (Bhosari ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.