Wakad Crime : घरातील दागिने आणि वस्तूंचा अपहार केल्याप्रकरणी पती आणि दीरा विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – घरातील (Wakad Crime) सोन्याचे दागिने, टॅब, कॉम्पुटर, बँकेचे कागदपत्र असा पाच लाख 35 हजार रुपये किमतीच्या साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी पती आणि पतीचा भाऊ (दीर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 मे रोजी सकाळी पिंपळे सौदागर येथे घडला.

चांदणी सचिन टंडन (वय 42, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी 30 मे रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सचिन कुमार टंडन (रा. छत्तीसगड), दीर नवीन कुमार टंडन (रा. छत्तीसगड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : दारूच्या नशेत आईला मारहाण करत आईची दोन बोटे तोडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चांदणी आणि त्यांचे पती सचिन हे एकत्र राहत असताना दोघांना माहिती आहे अशा विश्वासाने त्यांनी घरात 118 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते. ते दागिने, एसआर कंपनीचा टॅब, कॉम्पुटर आणि बँकेचे कागदपत्र असा एकूण पाच लाख 35 हजारांचा ऐवज सचिन आणि त्याचा भाऊ नवीन या दोघांनी फिर्यादी घरात (Wakad Crime) नसताना अपहार करून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.