Wakad Crime News: दवाखान्यातील मशीन देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची 92 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दवाखान्यात लागणारी हायड्रोथेरपीचे मशीन, बाथटब मशीन विकत देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका डॉक्टरकडून 92 हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली. पैसे घेऊन मशीन तसेच पैसे परत न देता फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2019 ते 2 मार्च 2021 या कालावधीत घडली.

डॉ. प्रिन्स प्रभाकर त्रिपाठी (वय 25, रा. रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), महेश सत्रा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्रिपाठी हे डॉक्टर आहेत. त्यांचे कोकणे चौक, रहाटणी येथे प्रिन्स फिजिओथेरपी क्लिनिक नावाचे रुग्णालय आहे. आरोपी रॉनिक सॅनिटेशन कंपनीचे मालक असल्याचे फिर्यादी यांना सांगण्यात आले.

क्लिनिकमध्ये लागणारे हायड्रोथेरपी मशीन आणि बाथटब मशीन कंपनीद्वारे देण्याचे आरोपींनी फिर्यादी यांना आमिष दाखवले. त्यापोटी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 92 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना मशीन दिली नाही. तसेच फिर्यादी यांचे पैसेही दिले नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.