Wakad Crime News : दोघा चोरट्याकडून चार मोबाईल जप्त; तीन गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी मोबाईल चोरी करणा-या एका चोरट्याला अटक केली. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून दोघांकडून चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

मुकुलदेव देवेंद्रसागर सिंह (वय 23, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सुरज सुतार आणि प्रशांत गिलबिले यांना माहिती मिळाली की, मुंबई-पुणे महामार्गावर ताथवडे येथे सेवा रस्त्यावर दोघेजण एका मोपेड दुचाकीवर संशयितरित्या थांबले आहेत. त्यांनी मोबाईल चोरी केली आहे.

या माहितीनुसार वाकड पोलिसांनी परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 50 हजार 500 रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

चौथ्या मोबाईलच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी मुकुलदेव आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे मोबाईल हिसकावताना महिलांचा विनयभंग देखील करत असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस अंमलदार सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, बाबाजान इनामदार, विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, राजेंद्र मारणे, शाम बाबा, सचिन नरुटे, विजय गंभीर, विक्रम कुदळ, जावेद पठाण, प्रमोद कदम, तात्या शिंदे, सागर सूर्यवंशी, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.