Wakad Crime News : इस्त्रीचे दुकान सुरु करण्यासाठी एक लाखाची मागणी करीत विवाहितेचा छळ

सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – इस्त्रीचे दुकान टाकण्यासाठी आणि इतर घरगुती कारणांसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची फिर्यादी वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानुसार सासरच्या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 16 मे 2006 ते 13 एप्रिल 2021 या कालावधीत रहाटणी आणि चिंचवडगाव येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

लक्ष्मण मुरलीधर जाधव (वय 38), मुरलीधर रामा जाधव (वय 65), अलका मुरलीधर जाधव (वय 56), श्रीराम मुरलीधर जाधव (वय 40), शीतल श्रीराम जाधव (वय 37), नारायण मुरलीधर जाधव (वय 32), मंगल नारयण जाधव (वय 30) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी विवाहितेकडे इस्त्रीचे दुकान टाकण्यासाठी तसेच इतर घरगुती कारणांवरून एक लाख रुपयांची मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्यावर तिला शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.