Wakad Crime News: सराईत गुन्हेगारावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – वाकडमध्ये एका सराईत गुन्हेगारावर एका टोळक्याने खुनी हल्ला केला. यामध्ये सराईत गुन्हेगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी थेरगावातील 16 नंबर येथे घडली.

पंकज धोत्रे असे गंभीर जखमी सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंकज धोत्रे थेरगाव मधील 16 नंबर येथे थांबला असताना एक टोळके त्याच्या जवळ आले. त्या अनोळखी टोळक्याने पंकजवर खुनी हल्ला केला. यात पंकज गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंकजची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.