Wakad Crime News : व्हिडीओ गेम पार्लरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – व्हिडीओ गेम पार्लरमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. त्यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 26) दुपारी श्रीनगर, रहाटणी फाटा चौकात लक्की व्हिडीओ गेम पार्लर मध्ये करण्यात आली.

अली दस्तगीर पटेल (वय 30, रा.मल्हार नगर, थेरगाव), राहुल मल्लेश राठोड (वय 20, रा. पाण्याच्या टाकीजवळ, थेरगाव), देवा मोहन चव्हाण (वय 28, पाण्याच्या टाकीजवळ, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर, रहाटणी फाटा चौकात लक्की व्हिडीओ गेम पार्लर मध्ये हारजितचा जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गेम पार्लरवर छापा मारून कारवाई केली. त्यावेळी आरोपी व्हिडीओ गेम मशीनवरील आकड्यांवर पैसे लावून हारजितचा जुगार खेळत होते. पोलिसांनी तिघांना अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.