Wakad Crime News : पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास आठवण चौक, थेरगाव येथे घडली.

संतोष देवराम शिंदे (वय 48, रा. काळेवाडी, रहाटणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हनुमंत पांडुरंग पवार (वय 45, रा. थेरगाव) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपीएमएल बस चालक संतोष दत्तात्रय पोळ (वय 38, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांच्या दुचाकीवरून आठवण चौक, थेरगाव येथून जात होते. त्यांच्या दुचाकीवर मृत शिंदे होते. रस्ता ओलांडत असताना इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसने पवार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये शिंदे यांचा मृत्यू झाला. तर पवार जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.