Wakad crime News : चालक लघुशंकेसाठी खाली उतरला अन प्रवाशाने कार पळवली

एमपीसी न्यूज – प्रवाशाला घेऊन जात असताना एके ठिकाणी कार चालक लघुशंकेसाठी खाली उतरला. त्यावेळी प्रवाशाने कार आणि कारमधील चालकाचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेअकरा वाजता वाकड सर्विस रोडवर, जंजीर हॉटेल जवळ घडली.

सलीम अहमद शेख (वय 30, रा. मलबार हिल, मुंबई) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 20) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोजेश रंगराव खंडारे (वय 32, रा. जेएनपीटी रोड, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांच्या कार (एम एच 01 / सी जे 1895) मध्ये आरोपी रोजेश हा प्रवाशी म्हणून बसला होता. वाकड सर्विस रोडवर, जंजीर हॉटेल जवळ शेख लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरले.

त्यावेळी शेख यांचा मोबाईल फोन कारमध्येच होता. शेख कारमधून खाली उतरल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी रोजेश याने शेख यांची 2 लाख 55 हजारांची कार आणि 5 हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.