Wakad Crime : काळेवाडीमध्ये भरदिवसा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथील सहयोग कॉलनी, राजवाडेनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून एक लाख 98 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी अडीच ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे.

नयन आनंद राऊत (वय 40, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत त्यांच्या घराला कुलूप लावून मंगळवारी दुपारी अडीच वाजता बाहेर गेल्या. एक तासाने त्या घरी आल्या असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाटातून एक लाख 98 हजारांचे 39 ग्राम वजनाचे सोन्याचे आणि दोन भार वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.