Wakad : गॅस रिफील करताना सिलेंडरचा स्फोट; दुकानासह झोपडयांना आग

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करत असताना दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. मंगळवारी (दि.९) सायंकाळी सातच्या सुमारास वाकडमधील म्हातोबानगर परिसरात ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड म्हातोबानगर परिसरात बालाजी गॅस एजन्सी आहे. मंगळवारी सायंकाळी एजन्सीमध्ये छोट्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये बेकायदा रिफिलिंग करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. कामगार आणि दुकानदाराने प्रसंगावधान राखत दुकानाबाहेर पळ काढला. त्यानंतर आणखी एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने दुकानात तसेच बाजूच्या दोन झोपड्यांना आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांसह पिंपरी आणि रहाटणी अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी दुकान आणि झोपड्यांचे नुकसान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.