Pune : राज ठाकरे यांच्या सभेची सत्ताधारी भाजपला दखल घ्यावी लागली -अजित पवार

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या सभेतून वस्तुस्थिती सांगितली आहे. या सभेची चर्चा राज्यभरात सुरू असल्याने सत्ताधारी भाजपला राज ठाकरे यांच्या सभेची दखल घ्यावी लागली आहे, अशा शबदांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली.

राज ठाकरे यांच्या सभेचा प्रतिसाद पाहता शिरुरमध्ये सभा घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, कार्यकर्त्याची मागणी असल्यास मी त्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.