Wakad : अन सकाळी सकाळी रुममधून एक लाखांचे आठ मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – रूमचा दरवाजा उघडा असताना सकाळी (Wakad) सहा वाजता रूम मधून चक्क एक लाख 19 हजार रुपयांचे आठ मोबाईल चोरीला गेले आहेत ही घटना वाकड येथील मंगल नगर परिसरात मंगळवारी घडली आहे.

याप्रकरणी प्रवीण सुधीर गायकवाड वय 26 रा वाकड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी इसमानवर गुन्हा दाखल केला आहे.

BJP : महिला आमदारांचा अवमान करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई करावी – राम वाकडकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्रांचे 1 लाख 19 हजार रुपयांचे आट मोबाईल मोबाईल व  एक हजार रुपयांचे पॉकेट असा एकूण 1 लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरांनी घराच्या उघड्या दरवाजातून चोरून नेला आहे.

वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रूम वर भाड्याने राहणाऱ्या मुलांचे फोन लॅपटॉप चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाहेर राहत असताना आपल्या मौल्यवान वस्तूंची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन (Wakad) पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.