_MPC_DIR_MPU_III

Wakad : दोरीने गळा आवळून मुलाचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव!; आई, वडील, भावावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ भांडणाच्या रागातून आई, वडील आणि भावाने मिळून तरुणाचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोरी तरुणाच्या हातात देऊन आत्महत्येचा बनाव केला. ही धक्कादायक घटना भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी येथे शनिवारी (दि. 9) दुपारी घडली.

_MPC_DIR_MPU_IV

विजय रामदास वखरे (वय 28, रा. भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी गणेश रामदास वखरे (वय 30), रामदास श्रीधर वखरे (वय 50), चंचल रामदास वखरे (वय 46, रा. भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय यांचे शुक्रवारी आपल्या पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणामध्ये त्याचा भाऊ गणेश आणि वडील रामदास यांनी मध्यस्थी केली. यामुळे संतापलेल्या विजयने वडिलांच्या हाताला चावा घेतला. तसेच भावावर चाकूने वार केले. याबाबत गणेश वखरे याने विजय विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शनिवारी दुपारी विजय आणि गणेश यांच्यामध्ये पुन्हा भांडण झाले. तिन्ही आरोपींनी मयत विजयचे दोन्ही हात, पाय दोरीने बांधले. आरोपींनी विजयचा खून करण्याचा कट रचून दोरीने विजयचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी विजयच्या हातात दोरी देऊन विजयने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

तशी खोटी माहिती देखील पोलिसांना देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस तपासात खुनाची बाब उघडकीस आली. याबाबत तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.