New Delhi : नाट्यरसिकांसाठी आजपासून NSD चे वेबिनार

New Delhi: NSD's webinar for drama lovers from today

एमपीसी न्यूज – कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये  सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने (एनएसडी) रविवार (दि.10) पासून एक आठवडाभर दररोज नाट्य क्षेत्रातल्या ज्येष्ठ कलाकारांद्वारे एका वेबिनारचे आयोजन केले आहे. 

ज्या नाट्य रसिकांना या परिसंवादाचा लाभ घ्यायचा आहे, ते एनएसडीच्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवर प्रसारित होणाऱ्या वेबिनारमध्ये आजपासून सहभाग नोदवू शकतात. रसिकांना या कार्यक्रमात प्राध्यापक सुरेश शर्मा, प्राध्यापक अभिलाष पिल्लई, दिनेश खन्ना, अब्दुल लतीफ खटाणा, हेमा सिंग, एस. मनोहरन, सुमन वैद्य, राजेश तेलंग यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दरम्यान हा वेबिनार आजपासून दररोज दुपारी 4 वाजता सुरू होणार आणि एक तासाच्या वेबिनारनंतर म्हणजेच पाचनंतर अतिरिक्त 30 मिनिटे लोकांना प्रश्न-उत्तरांसाठी मिळणार आहेत. वेबिनारमध्ये केवळ रंगमंचाच्या इतिहासावर आणि समीक्षेवरच नव्हे तर डिजिटल माध्यमातून व्यवहारिक प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.

या परिसंवादात व्याख्याने, लेक-डेम, मास्टर क्लास, नाट्य आणि इतर कला क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींशी संवाद तसेच भारतीय रंगभूमीच्या महान कलाकारांबरोबर सखोल चर्चांचा यात समावेश करण्यात आला आहे. या संवादामुळे संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी एक संसाधन सामग्री उपलब्ध होणार आहे. देशातल्या काना – कोपऱ्यात असणाऱ्या लोकांपर्यंत, जे त्यांच्या घरगुती क्षेत्रापर्यंतच मर्यादित आहेत आणि नियमित रंगमंचाच्या अभ्यासाच्या संपर्कात नाहीत अशांसाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने हा उपक्रम आखला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.