Wakad : मित्रांनी आईबाबत अपशब्द वापरल्याने मुलाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – दोन मित्रांनी आईबाबत अपशब्द वापरले. या कारणावरून एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 10) रहाटणी येथे घडली.

वैभव गजानन काळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई अर्चना काळे (वय 37, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे (रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे हे दोघे वैभव काळे यांचे मित्र आहेत. दोन्ही आरोपी यांनी वैभव त्यांच्या आईबाबत अपशब्द वापरले. ते सहन न झाल्याने वैभव याने 10 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.