Wakad : शासकीय वसतीगृहाच्या छताचा भाग कोसळून विद्यार्थिनी जखमी

एमपीसी न्यूज – छताचा (Wakad) भाग कोसळून विद्यार्थिनी जखमी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 5) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास वाकड येथे घडली.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरीनगर, वाकड येथे आदीवासी मुलींचे वसतीगृह आहे. या वसतीगृहातील चौथ्या मजल्यावरील खोली क्रमांक 27 मधील छताच्या थोडासा भाग (ढपली) पडला. यावेळी तिथे उभ्या असलेल्या अनिता गेणू पथवे हिच्या डोक्‍यावर तो भाग कोसळला. त्यामुळे तिच्या कपाळाला दोन टाके पडले आहेत.

Alandi : शौर्य जागरण यात्रेचे आळंदीत फुलांच्या वर्षावात ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत

याबाबत अग्निशामक दलास सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास माहिती मिळाली असता रहाटणी अग्निशामक (Wakad) उपकेंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाला. उपचारानंतर अनिता या आपल्या बहिणीकडे भोसरी येथे गेल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.