Alandi : शौर्य जागरण यात्रेचे आळंदीत फुलांच्या वर्षावात ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत

एमपीसी न्यूज : 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा व विश्व हिंदू परिषद षष्टीपुर्ती वर्षा निमित्त शौर्य जागरण यात्रेचे (Alandi) आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे. विविध ठिकाणी या शौर्य यात्रेचे भव्य स्वागत होत आहे.

आज  आळंदीमध्ये शौर्य जागरण यात्रेचे फुलांच्या वर्षावात व ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.

शिवरथावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन माता भगिनींनी यावेळी केले. तसेच शिवरथावरून सुद्धा शिवभक्तांवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. यावेळी लाठी काठी, तलवार बाजी विविध मर्दानी खेळ मुलींनी सादर केले.

Maharashtra News : रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

शौर्य जागरण (Alandi) यात्रे निमित्त शिव भक्तांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केली होती. या रथ यात्रेने देहूफाटा ते चाकण चौक, चाकण चौक ते प्रदक्षिणा रोड मार्गे मार्गक्रमण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.