Maharashtra News : रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – राज्याचे माजी पोलीस महासंचालक (Maharashtra News) रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार रजनीश सेठ यांच्या नियुक्तीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही नियुक्ती त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.

माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांची 26 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे एमपीएससीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले होते. निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले. एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यासाठी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी शासनाकडे अर्ज केला होता.

Pune : पालकमंत्री पद जाताच चंद्रकांत पाटील यांचा बैठकांचा धडाका

रजनीश सेठ यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील निवृत्त वरिष्ठ (Maharashtra News) अधिकारी प्रदीपकुमार या तिघांच्या नावांची अंतिम यादी राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शासनाकडे पाठवली होती. त्यातून रजनीश सेठ यांची एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. रजनीश सेठ यांच्याकडे एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.