Pune : पालकमंत्री पद जाताच चंद्रकांत पाटील यांचा बैठकांचा धडाका

एमपीसी न्यूज – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Pune) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी दिल्यानंतर पाटील यांनी आज (गुरुवारी) जिल्ह्यातील विविध कामांच्या आढावा बैठकांचा धडाका लावला. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, पुणे विमानतळ येथील नवे टर्मिनल, जिल्हा परिषद यंत्रणेकडील जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य स्तर यंत्रणेकडील कामांचा आढावा घेतला. काल पालकमंत्रीपद काढल्यानंतर आज पाटील यांनी बैठका घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासूनच चंद्रकांत पाटील यांच्याकडील पालकमंत्रीपद जाणार अशी चर्चा होती. त्यावर तीन महिन्यांनी म्हणजे बुधवारी शिक्कामोर्तब झाले. चंद्रकांत पाटील यांच्याकडील पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे दिले. तर, पाटील यांच्याकडे सोलापूर, अमरावती या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पवार यांनी सत्तेत सहभागी होताच पुणे जिल्ह्यातील कामकाजात लक्ष घातले होते. जिल्हा नियोजन समितीचा निधी रोखला होता. पालकमंत्री नसतानाही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका, विकास कामांचा आढावा घेत होते. त्यामुळे पवार आणि पाटील यांच्यात कोल्डवार सुरु असल्याची चर्चा होती. चंद्रकांत पाटील यांनीही पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारही केली होती.

आता अजित पवार यांच्याकडे बुधवारी पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवसभर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढाव घेतला. पुणे विमानतळ येथे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा आढावा घेतला.

Pune : ललित पाटील पलायन प्रकरणात ससून हॉस्पिटलच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-3 मुळे हिंजवडी परिसरातील (Pune) वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार आहे. या मेट्रो मार्गिकेच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

पुणे विमानतळ येथील नवे टर्मिनलचा आढावा घेत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्यादृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणेकडील 2022-23 मध्ये मंजूर कामांच्या प्रगतीचा आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य स्तर यंत्रणेकडील 2022-23 मध्ये मंजूर कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.