Wakad News: आरोपीच्या आईनेच राखली पोलिसांची लाज, कोठडीतून पळालेल्या मुलाला आईनेच केले पोलिसांच्या स्वाधिन

एमपीसी न्यूज : बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात कैद असणारा आरोपी वाकड पोलीस ठाण्यातून फरार झाला.(Wakad News) त्याने फरार होताच त्याच्या आईशी संपर्क साधला, मात्र आईने तिची नैतिकता दाखवत मुलाला पुन्हा पोलिसांच्या हवाली केले.यामुळे पोलिसांचे उघडे होणारे वाण झाकले गेले असेच म्हणावे लागेल.

 

अनसर मुसासाब शेख (वय 29 रा.काळेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने 17 जुलै रोजी थेरगाव येथील बागेत खेळायला आलेल्या आठ वर्षाच्या मुलाला च़ॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगीक अत्याचार केले होते. यावरून पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली होती.

 

त्याला वाकड पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. अनसर हा बिगारी काम करत असल्याने त्याने पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीचे बांधकाम तकलादू असल्याचे पाहिले. त्याने स्वच्छता करायच्या ब्रशने विटांमधील सिमेंट पोखरून काढत विटा ढिल्ल्या केल्या.(Wakad Crime) 25 जुलै रोजी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास त्याने विटा काढून टाकत तेथून पळ काढला. खूपवेळ झाला तरी शेख बाहेर कसा आला नाही म्हणून पोलीसांनी दार ठोकला असता आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. शेख पळून गेला समजताच पोलिसांची धावाधाव सुरू झाली.

 

Blood Donation : लॉरियल इंडिया एम्प्लॉई युनियनचे रक्तदान शिबीर

 

दरम्यान शेखने पूर्वी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन आईला फोन केला. त्याने केलेल्या गुन्ह्यामुळे घरचे आधिच त्याच्यावर चिडले होते. त्यात त्याचा फोन आल्याने आईने त्याला गोड बोलून बोलण्यात गुंतवले व त्याला तिथेच थांबण्यास सांगितले. तातडीने वोकड पोलिसांना फोन करत तो असलेल्या ठिकाणाची माहिती दिली.यावरून पोलिसांचे एक पथक तेथे गेले व त्यांनी शेखला अटक केली.

 

शेख याला दारुचे व्यसन असून त्याला एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. त्याच्या व्यसनामुळे त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.(Wakad News) त्यात त्याने हा गुन्हा केल्यापासून त्याच्या घरचे त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत. याच संतापातून आईने मुलाला परत पोलिसांच्या हवाली केले आहे.

 

 

दरम्यान या सगळ्यात पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही चव्हाट्यावर आली आहे. आईने नैतिकता दाखवली नसती तर आज एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरला असता. मात्र आईने दाखवलेल्या चतुराईने अवघ्या काही तासात आरोपी पुन्हा अटक झाला. शेख याची रवानगी आता येरवाडा कारागृहात करण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.