Crime News : मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरास शिवाजीनगर पोलिसांकडून बेड्या

एमपीसी न्यूज – मोटारसायकलवरून येवून मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि.2) केली.

 

ऋषी सुधाकर गायकवाड (वय.19 रा.बोपोडी) असे अटक केलेल्या चोराचे नाव असून पोलिसांनी त्याला बोपीडी येथून अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ऋषी याने 24 जुलै रोजी शिवाजीनगर कोर्टाच्या गेटजवळून एका महिला कारमध्ये बसली असताना त्यांचा 15 हजार रुपयांचा मोबाईल गाडीतून चोरून नेला होता. महिलेने चोराचे वर्णन सांगितले होते. त्यानुसार तपास करुन पोलिसांनी ऋषीला बेड्या ठोकल्या.पोलीस तपासात त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले व त्याच्याजवळील चोरीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.