Wakad : काळाखडक येथून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाकड येथील (Wakad) कालाखडक परिसरात हातभट्टी दारूची वाहतूक सुरु असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत दोघांना अटक करून अवैध दारूसह दोन लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दिनेश सहादु सहानी व प्रदीप संदीप सरोज (दोघे रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाखडक वाकड येथे दारूची वाहतूक करणारा टेम्पो येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एमएच 12 क्यू डब्ल्यू 2272 हा टेम्पो अडवला. टेम्पोमधून गावठी हातभट्टी दारूने भरलेले 14 मोठे हत्ती कॅन्ड आणि टेम्पो असा दोन लाख 14 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Wakad : लेखी शपथपत्र देऊन देखील विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे एक) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे दोन) रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक (Wakad) संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, पोलीस शिपाई सौदागर लामतुरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.