Wakad : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला वाकड पोलिसांकडून अटक

Wakad police arrest fugitive accused in Mocca crime

एमपीसी न्यूज – मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मागील चार महिन्यांपासून फरार होता.

समीर देविदास बोरकर (वय 24, रा. हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या विरोधात मोक्का अंतर्गत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, चार महिन्यांपासून तो फरार होता. दरम्यान तो मुंबई, नारायणपूर भागात चोरून फिरत होता.

त्याचा शोध घेण्यासाठी तपास पथक नियुक्त करण्यात आले होते. आरोपी वाकड परिसरातील विशालनगर भागात येणार आहे, अशी माहिती तपास पथकातील कर्मचारी दीपक भोसले यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी विशालनगर भागात सापळा लावून शिताफीने आरोपी बोरकर याला ताब्यात घेतले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बिभीषन कन्हेरकर, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, प्रमोद भांडवलकर, दीपक भोसले, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सचिन नरुटे, शाम बाबा, नितीन गेंगजे, सुरज सुतार, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.