Wakad News : जागतिक महिला दिनानिमित्त वाकड पोलीस विभागाचा महिला सक्षमीकरण मेळावा

विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची हजेरी

एमपीसी न्यूज – वाकड पोलीस विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी हजेरी लावत महिलांचे मनोधैर्य उंचावले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रमुख पाहून उपायुक्त आनंद भोईटे, विशेष अतिथी पद्मश्री बिजमाता राहीबाई सोमा पोपेरे, मराठी अभिनेत्री प्रिया मराठे, बाल मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. राणी खेडीकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वाकड विभाग भरोसा सेल फलकाचे अनावरण तसेच डॉ.  यांच्या ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सुकन्या कुलकर्णी आणि ग्रुपने गणेश वंदना केली. मानसी अँड ग्रुपने महिला सक्षमीकरण या विषयावर मूकनाट्य सादर केले. पुणे जिल्हा कुडो संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले.

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शहरी आणि ग्रामीण जीवनातील फरक सांगत ग्रामीण भागातील महिला कष्टाची कामे करतात म्हणून त्यांची शारीरिक क्षमता चांगली राहते. त्याप्रमाणे शहरी भागातील महिलांनी देखील शारीरिक क्षमता चांगली ठेवायला हवी. आधुनिक जगात पारंपरिक शेती सोडून रासायनिक खते, केमिकल्स यांचा वापर करून अन्नधान्याच्या गुणवत्तेचा नाश केला जात आहे. त्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. पारंपरिक बियाणे, सेंद्रिय खते यांचा वापर करून शेती करावी. शहरी भागातील महिलांनी त्यांच्या परसबाग, बाल्कनी येथे पारंपरिक बियाणे वापरून भाजीपाला पिकवावा असे आवाहन पोपेरे यांनी केले.

अभिनेत्री प्रिया मराठे यांनी महिलांना आपण स्पेशन आहोत असा आत्मविश्वास बाळगण्याचा सल्ला दिला. स्त्रियांनी त्या स्त्री असल्याचा कमीपणा बाळगू नये. स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांसोबत काम करतात, असेही मराठे म्हणाल्या.

बाल मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. राणी खेडकर यांनी देहविक्री करणा-या महिलांच्या जीवनाबाबत आणि त्यांना येणा-या समस्यांबाबत सांगितले. रेड लाईट एरिया मधील देहविक्री करणा-या महिलांच्या मुलांच्या आयुष्याबाबत त्यांनी माहिती दिली. स्त्रियांनी समाजात वावरताना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली पाहिजे त्याशिवाय महिला सक्षमीकरण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.’

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड पोलीस महिला संरक्षणासाठी बांधील आहेत. महिलांनी अन्याय सहन करू नये. अन्याय झाल्यास तक्रार करण्यासाठी महिलांनी समोर यावे, असे सांगत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे राबविण्यात येणारे पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप, दामिनी पथक, भरोसा सेल, महिला बाल संगोपन केंद्र अशा विविध संकल्पनांची आयुक्तांनी माहिती दिली.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी प्रास्ताविक केले. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी आभार मानले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, रामचंद्र घाडगे, वाकड विभागातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाकड, हिंजवडी, सांगवी भागातील महिला दक्षता समितीच्या सदस्या आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.