Nigdi Crime News : इलेक्ट्रिकल दुकानातून पाण्याच्या मोटर आणि डिव्हीआर मशीन चोरीला

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिकल दुकानातून पाच पाण्याच्या मोटर आणि डिव्हीआर मशीन चोरीला गेल्या आहेत. निगडी तळवडे रोडवरील काजल इलेक्ट्रिकल दुकानात 03 ते 04 एप्रिल रोजी ही घटना घडली.

शरद सखाराम जीभकाटे (वय 46, रा. रूपीनगर तळवडे, मुळगाव निघोजे) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या काजल इलेक्ट्रिकल दुकानातून 63 हजार रूपये किंमतीच्या पैसे, 05 पाण्याच्या मोटार आणि डिव्हीआर मशीन चोरी केल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून मुद्देमाल चोरी केला. तसेच, दुकानात बसवलेला कॅमेरा तोडून नुकसान केले. देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.