Alandi : आळंदी शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

एमपीसी न्यूज – गुरुवार दि. 25 रोजी आळंदी शहराच्या भामा-आसखेड धरणावरून (Alandi) येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर कुरुळी (ता. खेड) येथे फ्लो मिटर बसविण्यात येणार आहे. त्या कामामुळे  गुरुवार दि. 25 रोजी संपुर्ण आळंदी शहारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 26 रोजी पासून नियमितपणे रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. याबाबत माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी यावेळी दिली.

Wakad : नातेवाईक महिलेस त्रास देत असल्याने झाला तरुणाचा खून; दोघांना अटक

 पाणीपुरवठा विभागाच्या बदललेल्या नियोजनास सहकार्य करावे असे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपासून आळंदी येथील जलशुद्धीकरणं केंद्राला  कुरुळी येथून कमी प्रवाहाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब होत आहे.त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा अवेळी होत असल्याची माहिती जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्याने (Alandi) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.